जिल्हा परिषद शाळांना कॉम्प्युटर व CCTV वाटप

हतनूर, जैतापूर फेब्रुवारी २०२६
शैक्षणिक, सुरक्षा

१४ फेब्रुवारी २०२६ रोजी हतनूर आणि जैतापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या सुरक्षिततेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दोन्ही शाळांना एकूण ३० सीसीटीव्ही कॅमेरे तसेच २ संगणक भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा उपक्रम सुजित भोजणे आणि हरीश कोठारी यांच्या निधीतून साकारण्यात आला. शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होणार असून शालेय परिसर अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध बनण्यास मदत होणार आहे. तसेच संगणकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांना लहान वयापासूनच डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. आजच्या तंत्रज्ञानाधारित युगात संगणकाचे ज्ञान अत्यंत आवश्यक बनले असून या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

आभार फाऊंडेशन – राजू आबा हारदे मेमोरियल ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कर्मयोगी स्व. राजू आबा हारदे यांचा ठाम विश्वास होता की, विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिल्यास त्यांच्यामध्ये ज्ञानाची उत्सुकता निर्माण होते आणि भविष्यातील संधींसाठी ते अधिक सक्षम बनतात. त्यांच्या याच दूरदृष्टीपूर्ण विचारांना पुढे नेत ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी हे कार्य करण्यात आले.

आबांच्या कमानीचे लोकार्पण व महाशिवरात्रीनिमित्त फराळ

गल्लेबोरगाव फेब्रुवारी २०२६
सामाजिक

गल्लेबोरगाव – पळसगाव रस्त्याच्या विकासासाठी केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कर्मयोगी स्व. श्री. राजू (आबा) आसाराम पा. हारदे यांना अभिवादन म्हणून “कर्मयोगी स्व. श्री. राजू (आबा) आसाराम पा. हारदे मार्ग” या नावाची कमान उभारण्यात आली. या रस्त्याची अवस्था पूर्वी अत्यंत खराब होती. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण होत असे, तर नागरिकांना दुचाकीने प्रवास करणेही अवघड बनत असे. या प्रश्नासाठी स्व. राजू आबा हारदे यांनी अनेक उपोषण आंदोलने केली, शासन अधिकाऱ्यांना निवेदने दिली आणि सातत्याने पाठपुरावा करून डांबरी रस्त्यासाठी संघर्ष केला.

ग्रामस्थांच्या विनंतीनुसार ग्रामपंचायतीच्या परवानगीने ही कमान उभारण्यात आली. मोनिका सुजित भोजणे, विजय राजू हारदे आणि अजय राजू हारदे यांनी ग्रामस्थांच्या भावनेचा आदर राखत या कामासाठी योगदान दिले. दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर कमानीचा लोकार्पण सोहळा स्व. राजू आबा हारदे यांच्या पत्नी सौ. सुनीता हारदे आणि मातोश्री सौ. अंजनाबाई हारदे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमास सुरेश बांकर, माजी कृषी आयुक्त भागडे साहेब, भाऊसाहेब थोरात तसेच अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. लोकार्पणानिमित्त व महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपस्थित ग्रामस्थांना फराळाचे वाटप करण्यात आले. ही कमान स्व. राजू आबा हारदे यांच्या समाजसेवा, संघर्ष आणि ग्रामीण विकासासाठीच्या योगदानाची कायमस्वरूपी आठवण म्हणून उभी राहणार आहे.

आदिवासी बांधवांसाठी किराणा किट व वस्तूंचे वाटप

जेहुर – कन्नड परिसर • नोव्हेंबर २०२४
सामाजिक

“एक दिवा वंचितांसाठी” या मानवतावादी भावनेतून यावर्षीची दिवाळी समाजातील उपेक्षित, वंचित आणि आदिवासी कुटुंबांसाठी समर्पित करून “पालावरची दिवाळी” हा उपक्रम राबवण्यात आला. दिवाळी हा प्रत्येकासाठी आनंदाचा सण असला तरी समाजातील अनेकांना आजही मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो. या कुटुंबांपर्यंत प्रकाशाचा आनंद पोहोचवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत संवेदनशीलपणे राबवण्यात आला.

जेहुर ठाकरवाडी, कोळवाडी तांडा, आंबा तांडा, गल्लेबोरगाव आणि कन्नड परिसरातील शेकडो आदिवासी कुटुंबांना किराणा किट, ब्लँकेट, कपडे, स्वेटर्स, सुकामेवा, मिठाई व आवश्यक जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वस्तूंमुळे अनेक कुटुंबांना दिवाळी सण आनंदात आणि सन्मानाने साजरा करता आला. विशेषतः थंडीपासून बचाव करण्यासाठी दिलेली ब्लँकेट व गरम कपडे ही अत्यंत उपयुक्त अशी भेट ठरली.

हा उपक्रम कर्मयोगी स्व. राजू आबा हारदे यांच्या समाजसेवेच्या विचारांना जपणारा आणि पुढे नेणारा ठरला. त्यांनी आयुष्यभर वंचित, शेतकरी, तांडा–पाड्यांवरील कुटुंबांसाठी केलेल्या सेवाभावाची आठवण करून देत त्यांच्या “वंचितांच्या घरातही दिवा पेटला पाहिजे” या विचाराला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.

उपक्रमाच्या यशस्वीतेत आभार फाऊंडेशन – राजू आबा हारदे मेमोरियल ट्रस्ट, जीवनज्योत ट्रस्ट, आर्य समाज ट्रस्ट, तसेच रोटरी क्लब मूलुंड यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

पुण्यतिथी निमित्त आरओ वॉटर फिल्टर

गल्लेबोरगाव, खुलताबाद, छ. संभाजीनगर • ३० ऑगस्ट – ५ सप्टेंबर २०२५
सामाजिक, धार्मिक

कर्मयोगी स्व. श्री. राजू आबा हारदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गल्लेबोरगाव येथे ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान आठ दिवसीय श्रीमद्भागवत कथा व अखेरचा वर्षश्रद्धा कीर्तन सोहळा ह.भ.प. भागवताचार्य रामेश्वर महाराज मगर नावडीकर यांच्या कीर्तनातून भावपूर्ण वातावरणात पार पडला. कीर्तनानंतर महाप्रसादासाठी ग्रामस्थ, भाविक व नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या प्रसंगी ‘आभार फाऊंडेशन – राजू आबा हारदे मेमोरियल ट्रस्ट’ तर्फे गल्लेबोरगाव येथील जि. प. प्राथमिक शाळा व केंद्रीय प्राथमिक शाळेला ५० LPH क्षमतेचे RO फिल्टर व स्टील पाण्याची टाकी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या गरजेचा विचार करून केलेला हा उपक्रम गावकऱ्यांनी अतिशय स्वागतार्ह ठरवला. कार्यक्रमात ग्रामस्थ, नातेवाईक व उपस्थितांनी स्व. राजू आबा हारदे यांच्या शेतकरी हितासाठी व समाजसेवेतील योगदानाची आठवण प्रेमपूर्वक सांगितली. ग्रामस्थांच्या सहकार्याने हा आठ दिवसीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

कर्मयोगी स्व. श्री. राजू आबा हारदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गल्लेबोरगाव येथे ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान आठ दिवसीय श्रीमद्भागवत कथा व अखेरचा वर्षश्रद्धा कीर्तन सोहळा ह.भ.प. भागवताचार्य रामेश्वर महाराज मगर नावडीकर यांच्या कीर्तनातून भावपूर्ण वातावरणात पार पडला.

पुण्यतिथी निमित्त आरओ वॉटर फिल्टर

गल्लेबोरगाव, खुलताबाद, छ. संभाजीनगर • ३० ऑगस्ट – ५ सप्टेंबर २०२५
शैक्षणिक

जयंतीनिमित्त टिफिन वाटप उपक्रम

गल्लेबोरगाव, खुलताबाद, छ. संभाजीनगर • १८ जून २०२५
स्वास्थ्य

कर्मयोगी स्व. राजू आबा हारदे यांच्या (१ जून) जयंतीनिमित्त ‘आभार फाउंडेशन’ तर्फे गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना टिफिन वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता-सवयी, शिस्त, आणि मध्यान्ह भोजनासाठी स्वच्छ टिफिनची गरज याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. स्वच्छ डब्यातील पौष्टिक भोजनामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती, आरोग्य व एकाग्रता सुधारते याची जाणीव पालकांना व विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. कार्यक्रमास जगन्नाथ बापू खोसरे, विशाल खोसरे, अनिल चांदोरीकर, विठ्ठल हारदे, सुनिता राजू हारदे, काकासाहेब बारगळ, म्हस्के मॅडम, श्याम उगले, तुषार खोसरे, योगेश हारदे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व ‘आभार फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.

कर्मयोगी स्व. राजू आबा हारदे यांच्या (१ जून) जयंतीनिमित्त ‘आभार फाउंडेशन’ तर्फे गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना टिफिन वाटप करण्यात आले.